एक्स्प्लोर

'दंगल'मधून तिरंग्याचा सीन काढण्याचा पाकचा हट्ट, आमिर म्हणतो...

मुंबई : पाकिस्तानने बॉलिवूडसाठी आपली दारं पुन्हा खुली केली असली, तरी काही बाबतीत पाकची भूमिका आडमुठी आहे. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर 'दंगल' चित्रपटातील तिरंग्याच्या सीनला कात्री लावण्याचा हट्ट पाकने धरला होता. मात्र त्याला न जुमानता अखेर पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय आमिर खानने घेतला आहे. भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती वारंवार सुरु असल्यामुळे पाक कलाकारांना भारतातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तसंच पाक कलाकारांना यापुढे भारतीय चित्रपटात काम न देण्याचा चंग बांधण्यात आला. त्यानंतर पाकनेही बॉलिवूडपट रिलीज न करण्याचा फतवा काढला, जो काही दिवसांतच मागे घेण्यात आला. आमिर खानचा 'दंगल' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. डिसेंबर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या दंगलने 385 कोटींचा गल्ला जमवला आहे. पाकिस्तानी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेंसॉरने गेल्या आठवड्यात दंगल चित्रपटातील दोन दृश्यांना कात्री लावण्याची मागणी केली होती. या दोन दृश्यांमध्ये भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताचा समावेश आहे. मात्र पाक बोर्डाचं हे फर्मान ऐकून आमिरने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित दृश्यात काहीच कट्टर देशभक्तिपर नाही, त्याचप्रमाणे इतर देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील, असा कुठलाच आशय या सीन्समध्ये नाही. त्यामुळे एक तर हा चित्रपट प्रदर्शित करावा, किंवा अजिबात करु नये, कुठल्याही दृश्यांना कात्री लावली जाणार, अशी भूमिका आमिरने घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Full : मित्रपक्षांचा सन्मान, हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? ते आठवलेंशी सविस्तर चर्चाZero Hour : महायुती की मविआ मित्रपक्षांचा सन्मान करणार? ते हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी?Zero Hour With Ramdas Athawale : महायुतीत किती जागा मिळणार? रामदास आठवले EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Embed widget