एक्स्प्लोर
आमीर खानच्या 'दंगल'मधील नवं गाणं
मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमीर खानच्या बहुप्रतीक्षित 'दंगल' चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता दुसरं गाणंही रिलीज झालं आहे. 'ऐसी धाकड है' असे गाण्याचे बोल आहेत.
23 डिसेंबरला दंगल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दंगल सिनेमात आमीर खानने पैलवान आणि ऑलिम्पिक प्रशिक्षक महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. आमीर खानने दंगल चित्रपटात तरुण आणि वृद्ध महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं. त्यासाठी त्याने वजन कमालीचं वाढवण्याची आणि कमी करण्याची मेहनतही घेतली होती.
महावीर फोगट यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या नवोदित अभिनेत्री अनुक्रमे गीता आणि बबिताच्या भूमिकेत दिसतील. गीताने 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण तर बबिताने रौप्यपदक पटकावलं होतं.
म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? अशी टॅगलाईन असलेलं 'दंगल'चं पोस्टर काही महिन्यांपूर्वी लाँच झालं होतं. या पोस्टरवर वयस्कर आमीर खान त्याच्या चार मुलींसोबत दिसतो. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ सिनेमा 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
मिसाले दी जाती है, भूली नही जाती, 'दंगल'चा जबरदस्त ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement