Mumbai : गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Mumbai : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये भीषण आग लागली आहे.
Mumbai : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये (Dadasaheb Phalke Film City) भीषण आग लागली आहे. फिल्म सिटी मधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता आहे. 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेच्या सेटला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या आहेत.
'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. काही कलाकार या आगीत अडकले असून काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेचं शूटिंग सुरू होत असताना सायंकाळी चारच्या सुमारात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Fire broke out on the set of a TV serial in Goregaon film city. Efforts to douse the fire underway, no injuries reported: BMC pic.twitter.com/isDnIQZH7V
— ANI (@ANI) March 10, 2023
'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेच्या सेटजवळ असलेल्या गवतामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आधीदेखील बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'च्या सेटला आग लागली होती.
'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'गुम है किसी के प्यार मैं' ही हिंदी मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. स्टार प्लस या वाहिनीवर या मालिकेचं प्रसारण होत आहे. या मालिकेत आयेशा सिंह (Ayesha Singh) आणि नील भट्ट (Neil Bhatt) मुख्य भूमिकेत आहेत. भारती पाटील (Bharati Patil) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे मराठी कलाकारदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या