एक्स्प्लोर
Advertisement
‘उदाहरणार्थ नेमाडे’ पाहण्यासाठी पुण्यात तुफान गर्दी
भालचंद्र नेमाडेंच्या लिखाणात आढळणारा तिरकसपणा हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असल्याचं या डॉक्युफिक्शन चित्रपटातून समोर येतं.
पुणे : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर बनवलेला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा डॉक्युफिक्शन चित्रपट पाहण्यासाठी पुण्यातील थिएटरमध्ये तुफान गर्दी जमली होती. पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला होता.
थिएटरमधील खुर्च्यांच्या संख्येपेक्षा अधिक लोकांनी उभे राहून किंवा खाली बसून हा चित्रपट पाहिला. मात्र तरीही गर्दी हटत नसल्याने या चित्रपटाचे एकामागोमाग एक असे दोन शो घ्यावे लागले.
अक्षय ईंडीकर या तरुण दिग्दर्शकाने 40 दिवस नेमाडेंसोबत राहून हा डॉक्युफिक्शन चित्रपट बनवलाय. डॉक्युफिक्शन प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटात भालचंद्र नेमाडेंचं रोजचं आयुष्य, प्रवासादरम्यान त्यांच्याशी मारलेल्या अनौपचारिक गप्पा यांसोबत ‘कोसला’ आणि ‘हिंदू’ या त्यांच्या कादंबऱ्यांमधील उताऱ्यांचे रिक्रिएशन यांचा समावेश करण्यात आला आहे.
भालचंद्र नेमाडेंच्या लिखाणात आढळणारा तिरकसपणा हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असल्याचं या डॉक्युफिक्शन चित्रपटातून समोर येतं. नेमाडेंच्या लिखाणाचे चाहते असणाऱ्यांना नेमाडेंना आणखी समजून घेण्याची संधी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement