एक्स्प्लोर

Coronavirus | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनने गोळा केले 2500 PPE किट्स अन् लाखो रूपयांचा मदतनिधी

देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकला असतानाच कोरोना विरूद्धच्या लढ्यात देशाच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेत्री विद्या बालनही या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने कोरोना व्हायरस विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. आता पुन्हा एकदा विद्या बालन मदत करण्यासाठी पुढे आली आहे. कोरोना विरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी विद्या बालनने मोठी रक्कम जमा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात तिने माहिती दिली. विद्याने सांगितलं की, तिने गरजुंच्या मदतीसाठी फंड गोळा केला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना तिने सांगितले की, ती फार आनंदी आहे की, तिने डॉक्टरांसाठी 2500 हून अधिक पीपीई किट्स आणि 16 लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे.

विद्या बालनने सेलिब्रिटी शाउट-आउट प्लेटफॉर्म ट्रिंगसोबत, दृष्यम फिल्मचे मनीष मुंद्रा आणि फोटोग्राफरसोबतच चित्रपट निर्माते अतुल कास्बेकर यांच्यासोबत एकत्र येऊन हा मदतनिधी गोळा केला आहे.

विद्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने यासंदर्भात माहिती दिली आहे, विद्या व्हिडीओमध्ये म्हणाली की, 'मला आज सकाळी एका चांगल्या बातमीमुळे जाग आली. आम्ही 2500 पीपीई किट्सपर्यंत पोहोचलो आहोत. तसेच काही तासांतच 16 लाखांहून अधिक रूपये एकत्र करण्यात आले आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाने जे दान केलं आहे, त्यातूनच हे शक्य झालं. तुम्हा सर्वांना खरंच खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना अनेक आशीर्वाद. हीच खरी भारताची एकता आणि भावना आहे.'

दरम्यान, याआधीही विद्या बालनने स्वतः 1000 पीपीई किट्स डोनेट केले आहेत. तिने यासंर्भातील माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आपल्या पोस्टमध्ये विद्याने सांगितले होते की, 'नमस्ते, आपण आपल्या हेल्थ वर्कर्सना पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट) किट #WarAgainstCovid19 मध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी देत आहोत. मी आपल्या मेडिकल स्टाफसाठी 1000 पीपीई किट्स दान करणार आहे. इतर पीपीई किट्स आणि मदतनिधी गोळा करण्यासाठी ट्रिंगसोबत एकत्र येऊन काम करत आहे. देशभरात आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 1000 पीपीई किट्सची तत्काळ गरज आहे.'

संबंधित बातम्या : 

COVID-19 | हेल्थ वर्कर्सना प्रियांका चोप्राची मदत; 20 हजार बुटांचं वाटप #LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget