#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काही सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, तर काही नतारात्मक... अशातच लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसेचं प्रमाणही वाढताना दिसत आहे.
![#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन Coronavirus Lockdown On Domestic Violence anushka sharma vidya balan madhuri dixit lockdown on domestic violence #LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/20150619/voilence.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसा वाढताना दिसत आहेत. अशातच लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी एकत्र आले आहेत आणि त्यांनी घरगुती हिंसेच्या विरोधात जनजागृती केली आहे. या मोहिमेत बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच खेळाडूही सहभागी झाले आहेत.
घरगुती हिंसेच्या विरोधात जनजागृती करणारा हा व्हिडीओ रिलीज करण्यात आला असून यामध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित नेने आणि विद्या बालन यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या व्हिडीओमधून सर्व सेलिब्रिटींनी घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्यासाठी जनजागृती केली आहे. या व्हिडीओमध्ये सेलिब्रिटींनी घरगुती हिंसाचाराला बळी पडू नका, त्या विरोधात आवाज उठवा असं आवाहन लोकांना केलं आहे.
व्हिडीओमध्ये सेलिब्रिटी म्हणाले की, 'आपण एकत्र येऊन घरगुती हिंसेवर लॉकडाऊन लावू... जर तुम्ही घरगुती हिंसेने पीडित असाल, तर याबाबतच्या तक्रारीची नोंद करा. ही वेळ एकत्र येण्याची आणि घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याची आहे. जर तुम्ही घरगुती हिंसाचाराचे शिकार असाल, तर कृपया तक्रार नोंदवा...'
Coronavirus | मनोधैर्य वाढवणारं बॉलिवुडकरांचं 'मुस्कुराएगा इंडिया' गाणं; पंतप्रधानांकडून कौतुक
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्हिडीओ शेअर करताला लिहिलं आहे की, 'ही गोष्ट अत्यंत दुखद आहे. एकीकडे आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. तर दुसरीकडे घरगुती हिंसा वाढणं अत्यंत दुखद आहे. याविरोधात आवाज उठवा आणि 100 नंबरवर फोन करा.'
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा, अभिनेता राहुल बोस, फरहान अख्तर आणि चित्रपट निर्माता करण जोहरही या व्हिडीओमध्ये दिसून आले आहेत. हे अभियान अक्षरा केंद्रने स्पेशल सेल फॉर वुमन्स अॅन्ड चिल्ड्रनसोबत एकत्र येऊन सुरू केलं आहे.
संबंधित बातम्या :
Oops | ...जेव्हा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ऐश्वर्या प्रश्न विचारते!
सलमान भडकला, म्हणाला काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय
आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो..
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)