Charlie Chaplin Death Anniversary : जगाला खळखळून हसवणारे ‘दी ग्रेट’ चार्ली चॅप्लिन! वयाच्या 26 व्या वर्षीच झालेच सुपरस्टार
Charlie Chaplin : चार्ली चॅप्लिन एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता.
Charlie Chaplin : चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता. त्याने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखक, निर्माता, संगीतकार अशा सर्वच भूमिका लीलया पार पाडल्या आहेत.
चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला. चार्लीला बालपणीच अत्यंत गरिबी, आई-वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पण तरीही तो आपल्या अभिनयाने लोकांना हसवत राहिला. त्याने त्यांचं दु:ख लपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या दु:खावर व्यक्त होताना तो म्हणायचा,"मला पावसात भिजायला आवडतं कारण तेव्हा माझे अश्रू कोणीही बघू शकत नाही".
विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी विशेष ख्याती
चार्लीने वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षी लोकांना हसवायला सुरुवात केली. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. 1914 साली प्रदर्शित झालेला 'मेकिंग अ लिविंग' हा चार्ली चॅप्लिनचा पहिला मूकपट. त्यानंतर त्यांचा 1921 साली 'द किड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात ते पहिल्यांदा अभिनय करताना दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपल्या अनोख्या कलेद्वारे जगाला हसवले.
वयाच्या 26 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन सुपरस्टार झाले होते. त्यांनी अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांनी अनेक अविस्मरणीय सिनेमांची निर्मिती केली. यात 'द किड', 'द पिलग्रिम', 'वुमन इन पॅरिस', 'गोल्ड रश' अशा सिनेमांचा समावेश आहे.
वैवाहिक आयुष्यात घडल्या नाट्यमय घडामोडी... (Charlie Chaplin Marriage Life)
चार्ली चॅप्लिनने 1998 साली 16 वर्षीय अभिनेत्री मिंड्रेड हैरीससोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फक्त दोन वर्षच टिकू शकलं. त्यानंतर तो पुन्हा लिटा ग्रे या अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकला. पण त्यांचं नातंदेखील फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर त्याने 1936 साली पोलेट गोदार्गसोबत तिसरं लग्न केलं. त्यानंतर त्याने 1943 साली 18 वर्षीय उना ओ नीलसोबत सुखी संसार केला. त्या दोघांनी 'सिटीलाइट', 'द ग्रेट डिक्टेटर' अशा लोकप्रिय सिनेमांची निर्मिती केली.
चार्ली चॅप्लिनचे सर्वोत्कृष्ट सिनेमे :
- मॉडर्न टाइम्स (Modern Times)
- द किड (The Kid)
- ए डेज प्लेजर (A Day Pleasure)
- द ग्रेट डिक्टेटर (The Great Dictator)
- चॅप्लिन (Chaplin)
- अ डॉग्स लाइफ (A Dog's Life)
- द सर्कस (The Circus)
- द इमिग्रेंट (The Immigrant)
- द बॅंक (The Bank)
- सनीसाइड (Sunnyside)
संबंधित बातम्या