एक्स्प्लोर
'राबता'वर सेन्सॉर बोर्डाची कात्री, अश्लील भाषा आणि किसिंग सीन डिलीट
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी राबता चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील अनेक दृश्यांवर कात्री चालवली आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात हा सिनेमा पाहिला आणि चित्रपटातील काही दृश्य हटवण्याचा निर्णय घेतला.
या सिनेमात अनेक शिव्यांचा वापर केला आहे, जे दाखवणं शक्य नाही, असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सिनेमातील काही सीनमध्ये अश्लील भाषा वापरली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मते, "ही एक साधी प्रेमकहाणी असून त्यात शिव्यांची काहीच आवश्यकता नाही." इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना कृती आणि सुशांतचा सिनेमातील किसही फार हॉट वाटला.
"जर तुम्हाला U/A प्रमाणपत्र हवं असेल तर काही सीनमध्ये बदल करा, अन्यथा चित्रपटला A प्रमाणपत्रच दिलं जाईल, यासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असं सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
'राबता' सिनेमा मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडला आहे. तेलुगू सिनेमा 'मगधीरा'ची कहाणी चोरल्याचा आऱोप केला जात होते. यानंतर पंजाबी सिंगर जे स्टारनेही सिनेमातली 'मैं तेरा बॉयफ्रेण्ड' ह्या गाण्याची चोरी केल्याचाही आरोप केला आहे. या प्रकारानंतर हे गाणं यू ट्यूबवरुन हटवण्यात आलं होतं. मात्र टी-सीरिजने स्पष्ट केलं की, हे गाणं आमचंच होतं आणि जे स्टारनेच ते चोरलं होतं.
'राबता' सिनेमात सुशांत सिंह राजपूर आणि कृती सेननसोबतच जिम सर्भही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याआधी जिम सर्भ 'नीरजा' सिनेमात दिसता होता.. दिनेश विजान दिग्दर्शित 'राबता' सिनेमा 9 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता राजकुमार राव 324 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणार आहे.
सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement