एक्स्प्लोर

Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

 सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोहोळ शहरातील एका धाब्याच्या बाहेर थेट ईव्हीएम मशीन आढळून आल्यानं निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद उमेदवार उमेश पाटील यांनी तर ही निवडणूकच रद्द करण्याची थेट मागणी केली आहे.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरातील हॉटेल स्वराज्य…

रात्रीची अकराची वेळ…

आणि याच ठिकाणी अचानक ईव्हीएम मशीन दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

क्षणात नागरिकांची गर्दी वाढली…

मतदान पार पडल्यानंतर मशीन धाब्याबाहेर कशी काय? असा सवाल उपस्थित झाला…

आणि पाहता पाहता हा संशय प्रचंड संतापात बदलला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी धावले…

निवडणूक कर्मचाऱ्यांना अक्षरशः जाब विचारला जाऊ लागला…

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

जमाव शांत करण्याचे प्रयत्न झाले…मात्र आक्रमक झालेल्या उमेश पाटील यांनी संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरच गंभीर आरोप केले.

बाईट – उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (रात्रीचा बाईट)

या प्रकरणावर प्रशासनालाही खुलासा करावा लागला आहे. धाब्याबाहेर आढळून आलेल्या मशीन ‘राखीव’ स्वरूपातील असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांतील विसंवादामुळे हा प्रकार घडल्याचं उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

बाईट – संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी

मात्र प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतरही उमेश पाटील समाधानी नाहीत. राखीव असल्या तरी त्यातून छेडछाड होऊ शकते, असा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.

या संपूर्ण निवडणूक रद्द करण्याची… आणि पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

बाईट – उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

आधी प्रचारात आरोप-प्रत्यारोप…

आणि आता थेट मतदानाच्या रात्री धाब्यावर सापडणारी ईव्हीएम… या साऱ्या प्रकारामुळे मोहोळ तालुक्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे.

पिटीसी :- सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडलेली ही एकमेव वादग्रस्त घटना नाहीये. दक्षिण सोलापुरात एका ईव्हीएम मशीनखाली चक्क लिंबू-काळा दोरा आढळला… हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. अकलूजमध्ये एका उमेदवाराने गोपनीयतेचा भंग करत मुलासह मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला… आणि आता रात्री मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन थेट धाब्यावर आढळली आहे. या सगळ्या घटनांमुळे निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय..

आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
Embed widget