एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल झाला आहे. बॉडीगार्ड शेरावर मुंबईतील डीएन नगर पोलिसात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेराने अंधेरीतील गुलमोहर रोडवरील हुक्का पार्लरमध्ये वेटरला मारहाण केली. त्याप्रकरणीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेरा हा गेल्या 18 वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो. सलमानच्या सावलीप्रमाणे तो त्याचे सोबत असतो.
सलमानही शेराला आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच मानतो. सलमानने शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची तयारी केली आहे.
शेरा हा सलमानच्या शेजारी राहात होता. त्यानंतर सलमानचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या सांगण्यावरुनच शेराने गेल्या वर्षी स्वत:ची इवेंट कंपनी सुरु केली आहे. याशिवाय त्याची 'टायगर सिक्युरिटी' नावाची कंपनी असून, तो सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement