Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
Aishwarya Rai Bachchan : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मधील (Cannes Film Festival) ऐश्वर्या राय बच्चनचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. यात अभिनेत्रीच्या हातावर प्लास्टर केलेलं दिसून येत आहे. तसेच तिच्या नव्या हेअरस्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Aishwarya Rai Bachchan in Cannes Film Festival Red Carpet : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival) ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) काय लूक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. पण काही वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्रीचे आऊटफिट जरे वेगवेगळे असले तरी हेअरस्टाईल मात्र सारखीच होती. चाहत्यांना तिची सेम हेअरस्टाइल खटकत होती. नुकतीच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली तेव्हा तिच्या हातावर प्लास्टर असलेलं दिसून आलं. अशातच आता ऐश्वर्याने यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये (Cannes Film Festival 2024) हजेरी लावली आहे. त्यावेळी तिच्या हातावरील प्लास्टरसह नव्या हेअरस्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
ऐश्वर्याच्या नव्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. काळा-पांढऱ्या रंगाचा चमकता स्टनिंग आऊटफिट अभिनेत्रीने परिधान केला होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून लोरियल पेरिस या ब्यूटी ब्रँडचं प्रतिनिधित्व करताना दिसून येत आहे. यावर्षीदेखील ती कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग होती. फ्रेंड रिवेरा रेड कार्पेटवर अभिनेत्रीने काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये फॅशनचा जलवा दाखवताना दिसून आली. फाल्गुनी शेन पीकॉकने तिचा आऊटफिट डिझाईन केला होता.
View this post on Instagram
विश्वसुंदरीने आपला फॅशन वॉक सिंपल आणि एलिगेंट ठेवला होता. तसेच तिची हेअरस्टाईल आणि दागिणेदेखील एलिगेंट होते. ऐश्वर्या रायचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिच्या हातावर प्लास्टर असलेलं पाहायला मिळत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हआधी ऐश्वर्या राय लेक आराध्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या-आराध्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं होतं.
ऐश्वर्याच्या लूकवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
ऐश्वर्या रायच्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्याने नक्की काय परिधान केलंय, मला वाटतं रेड कार्पेट लूकसाठी हिला एका चांगल्या डिझायनरची गरज आहे, ड्रेसवरची डिझाइन वाईट आहे, ऐश्वर्याचा नेहमीपेक्षा चांगला लूक, म्हणून ती विश्वसुंदरी आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आतापर्यंत 'या' अभिनेत्रींचा जलवा
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आतापर्यंत 'शार्क टँक'मधील नमिता थापर, उर्वशी रौतेला, दिप्ती साधवानी यांनी आपला जलवा दाखवला आहे. तर आरजे करिश्मासारखे नवोदित चेहरेदेखील यंदा जलवा दाखवताना दिसून येतील. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमदेखील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'साठी रवाना झाली आहे. 'चलो कान्स' म्हणत चाहत्यांना तिने आनंदाची बातमी दिली.
संबंधित बातम्या
























