(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Biggest Bollywood Disaster Movie 2024 : या वर्षातील डिजास्टर चित्रपट, 350 कोटी खर्च करुन फ्लॉप, तीन दिग्गज स्टार्सची चमक फिकी
Biggest Flop Bollywood Movie of 2024 : या वर्षात अनेक चित्रपट हिट ठरले पण एक चित्रपट असा आहे, ज्यासाठी 350 कोटी खर्च करण्यात आले, पण चित्रपट फूल टू फ्लॉप ठरला. या चित्रपटाबद्दल जाणून घ्या.
2024 Biggest Bollywood Disaster Movie : बॉक्स ऑफिसवर या वर्षी अनेक चित्रपट हिट ठरले तर, काही चित्रपटांना मात्र अपयश मिळालं. कोरोना काळानंतर या वर्षी प्रेक्षक थिएटरमध्ये दाखल होऊ लागल्याचं दिसलं. काही चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले, पण काही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. काही कमी बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तर कोट्यवधी रुपये खर्च करुनही काही चित्रपट चालले नाहीत.
या वर्षातील डिजास्टर चित्रपट
या वर्षी एक चित्रपट असा होता, जो बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक अयशस्वी ठरला. बिग बजेट चित्रपट आणि तगडी स्टार कास्ट असूनही हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांनी टाळलं. या चित्रपटासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण चित्रपट प्लॉप ठरला. या चित्रपटात एक किंवा दोन नाही तर तीन दिग्गज स्टार्सही होते, असं असतानाही या चित्रपटाचा फारशी कमाई करता आली नाही. यामुळेच हा चित्रपट या वर्षीचा डिजास्टर चित्रपट ठरला.
तीन दिग्गज स्टार्सची चमक फिकी
लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण हा या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप बॉलीवूड चित्रपट होता. हा चित्रपट बिग बजेटच्या तुलनेत काहीच कमाई करू शकला नाही. या चित्रपटात अनेक स्टार्स एकत्र दिसले पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करु शकला नाही.
350 कोटी खर्च करुनू फ्लॉप ठरले
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' एप्रिल 2024 मध्ये जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात अनेक दिग्गज स्टाईस एकत्र दिसले होते. यामध्ये मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन आणि रोनित रॉय यांच्या नावांचा समावेश आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच याची बरीच चर्चा झाली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
अक्षय आणि टायगरचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात अक्षय आणि टायगरने जबरदस्त ॲक्शन सीन्स दिले. दोघांनी कॉमेडीचं टायमिंगही जुळवलं. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवू शकला नाही. चित्रपटाचा ट्रेलरही खूपच प्रेक्षणीय होता. मात्र, चित्रपटगृहात प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी हा चित्रपट नाकारला. अक्षय-टायगरचा हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, पण चित्रपट काहीही खास कमाई करु शकला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :