एक्स्प्लोर
अभिनेता रणबीर कपूरला टायफॉईड
काही दिवसांपूर्वीच रणबीरने आपलं आयुष्य नीरस झाल्याचं सांगितलं होतं. त्यातच नव्या अडचणीने त्यात भर घातली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आयुष्यात सध्या काही आलबेल दिसत नाही. एकीकडे व्यावसायिक आयुष्यात रणबीर फारशी चमकदार कामगिरी करत नसताना वैयक्तिक आयुष्यातही आजारपणाला सामोरं जावं लागत आहे.
रणबीर कपूरला टायफॉईडची लागण झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरने आपलं आयुष्य नीरस झाल्याचं सांगितलं होतं. त्यातच नव्या अडचणीने त्यात भर घातली आहे.
अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात रणबीर सुपरहिरोच्या भूमिकेत आहे. रणबीरच्या बॉडीला चांगला शेप यावा, यासाठी त्याला स्पेशल डाएट आखून देण्यात आला आहे.
टायफॉईडने ग्रासल्यामुळे त्याला मेडिकल डाएट पाळावं लागणार आहे. विशेष म्हणजे फिजीकल ट्रेनिंगही सोडावं लागणार आहे.
शबाना आझमीचं गाव मिझवानमध्ये आयोजित फॅशन शोमध्ये रणबीर दीपिकासोबत रॅम्प वॉक करणार होता. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यावरही पाणी सोडावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement