Bhool Bhulaiyaa 2 : बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; लवकरच पार करणार 150 कोटींचा टप्पा
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. आतापर्यंत या सिनेमाने 137.54 कोटींची कमाई केली आहे.
Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रिलीजच्या तेराव्या दिवशी या सिनेमाने 4.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे.
पुढचा टप्पा 150 कोटी : कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यनने राजपाल यादवसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे,"पुढचा टप्पा 150 कोटी; 'भूल भुलैया 2' सिनेमाने सिनेमागृहात केला धमाका". 'भूल भुलैया 2' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून कार्तिक आर्यन चर्चेत आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
लवकरच पार करणार 150 कोटींचा टप्पा
'भूल भुलैया 2' हा सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. ‘भूल भुलैया 2’ पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने पहिल्या दिवशी 14.11 कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून, तुफान वेगाने पुढे जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या क्रेझसमोर कंगना रनौतचा ‘धाकड’ मात्र फिका पडला आहे. कंगनाचा बहुप्रतीक्षित ‘धाकड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे.
View this post on Instagram
कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारादेखील त्यांच्या सिनेमाच्या यशामुळे खूप खुश आहेत. 'भूल भुलैया 2' मुळे कंगनाचा 'धाकड' मात्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.
बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा दबदबा
कोरोना महामारीनंतर बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होऊ लागले. संजय लीला भंसाळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी', विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाइल्स' आणि आता 'भूल भूलैया 2' हे सिनेमे चांगलेच सुपरहिट झाले आहेत. तर दुसरीकडे 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमांनी चांगलाच गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या