Bhool Bhulaiyaa 2 Box office Collection : 'भूल भुलैय्या-2' ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; पाहा आत्तापर्यंतचे कलेक्शन
पाहूयात भूल भुलैय्या-2 या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Bhool Bhulaiyaa 2 Box office Collection : अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 133.09 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहेत. तरी अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. पाहूयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
भूल भुलैय्या-2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिल्या आठवड्यात भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं 92.05 कोटी एवढी कमाई केली. तर आठव्या दिवशी 6.52 कोटी आणि नवव्या वर्षी 11.35 कोटी कमाई या चित्रपटानं केली आहे. दहाव्या दिवशी या चित्रपटानं 12.77 कोटींची कमाई केली. तसेच रिलीज झाल्यानंतर आकराव्या दिवशी या चित्रपटानंतर 5.55 कोटी आणि बाराव्या दिवशी 4.85 कोटींची कमाई या चित्रपटानं केली. या चित्रपटानं आत्तापर्यंत 133.09 कोटी एवढी एकूण कमाई केली आहे.
कलाकारांचे मानधन
कार्तिक आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
'भूल भुलैय्या-3' रिलीज होणार का? भूषण कुमार म्हणाले...
भूषण कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, ' 'भूल भुलैया' या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टवर काम करण्यास आम्ही लवकरच सुरूवात करणार आहोत. भूल भुलैय्याचे दोन्ही पार्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यामुळे आम्हाला या चित्रपटाचा पुढचा पार्ट लवकरच रिलीज करायचा आहे. आमची टीम भूल भुलैय्या 3 चे डिटेल्स तुमच्यासोबत लवकरच शेअर करतील.'
हेही वाचा :
- Upcoming South Movies : RRR ते KGF 2 पर्यंत 'हे' धमाकेदार साऊथ सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार
- Cannes 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला कमल हासन आणि ए. आर रहमानने लावली हजेरी; शेअर केले फोटो
- Vikram : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; रिलीजआधीच केली 200 कोटींची कमाई
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















