Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : कार्तिकच्या भूल भुलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; केली एवढी कमाई
कार्तिकच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
Bhool Bhulaiyaa 2 Box office Collection : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवासांमध्ये या चित्रपटानं 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता 11 दिवसांमध्ये या चित्रपटानं 128.24 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा गाठेल असं म्हटलं जात आहे.
कार्तिक आणि कियाराचा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली. आता सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. चार दिवसांमध्ये या चित्रपटानं 66.71 कोटींची एकूण कमाई केली.
#BhoolBhulaiyaa2 is proving all calculations and estimations wrong... The [second] Mon numbers are an eye-opener... Crosses ₹ 125 cr, marches towards ₹ 150 cr... [Week 2] Fri 6.52 cr, Sat 11.35 cr, Sun 12.77 cr, Mon 5.55 cr. Total: ₹ 128.24 cr. #India biz. pic.twitter.com/4DCBtrDSIA
— taran adarsh (@taran_adarsh) May 31, 2022
भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
सेलिब्रिटींनं केलं चित्रपटचं कौतुक
अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं, 'या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचे तसेच चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन.'तर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'भूल भूलैय्या-2 चित्रपट हिट ठरल्याबद्दल कार्तिकला शुभेच्छा. 'एकला चलो रे' हे कधीच विसरु नकोस. तुझ्या कामामधून व्यक्त हो. ' विवेक यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत कार्तिकनं लिहिलं, 'धन्यवाद सर'
हेही वाचा :