एक्स्प्लोर
'देवसेना' अनुष्काचा 'भागमती' चित्रपटातील फर्स्ट लूक
7 नोव्हेंबर रोजी अनुष्का शेट्टीचा वाढदिवस आहे. हे निमित्त साधत आदल्या दिवशी तिचा लूक सादर करण्यात आला.
मुंबई : देवसेनेच्या व्यक्तिरेखेमुळे अक्षरशः घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या आगामी चित्रपटातील लूक रीव्हिल करण्यात आला आहे. अनुष्काच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'भागमती' चित्रपटातील अनुष्काचा लूक लाँच करण्यात आला आहे.
उद्या म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी अनुष्का शेट्टीचा 36 वा वाढदिवस आहे. हे निमित्त साधत आदल्या दिवशी तिचा लूक चाहत्यांसमोर सादर करण्यात आला. भागमतीमध्ये अनुष्का मुख्य भूमिका साकारत आहे.
फर्स्ट लूकमध्ये अनुष्काच्या हात, चेहराभर जखमा झालेल्या दिसत आहेत. तिचा हात खिळ्याने भिंतीवर ठोकण्यात आल्यासारखं दिसत आहे. तिच्या दुसऱ्या हातात हातोडा आहे.
https://twitter.com/UV_Creations/status/927512186468974592
जी अशोक यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अनुष्कासोबत उन्नी मुकुंदन दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement