एक्स्प्लोर
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, 'बाहुबली 2' चं नवं पोस्टर रिलीज
मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये कटप्पाने बाहुबलीला त्याच्या हातामध्ये घेतलेलं दिसत आहे, तर दुसरीकडे बाहुबली कटप्पाला मारताना दिसत आहे.
‘ज्या मुलाला त्याने वाढवलं, त्याच मुलाला त्याने मारलं,’ या कॅप्शनसह राजामौली यांनी पोस्टर शेअर केलं आहे. आमच्या डिझायनरला ही आयडिया सुचली आणि ट्वीट करण्याचा मोह आवरला नाही, असंही राजामौली यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ssrajamouli/status/840495978524237824
दिग्दर्शक राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमाचा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’ हा सिक्वेल सिनेमा आहे. यावर्षी 28 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यापूर्वी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सिक्वेलमधून मिळणार आहे. पण या पोस्टरमध्ये कटप्पा बाहुबलीला पुन्हा एकदा मारताना दिसत आहे, त्यामुळे या प्रश्नाचं कोडं सोडवण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.
संबंधित बातम्या :
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर 'बाहुबली 2' चं नवं पोस्टर
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बाहुबली-2चे नवे पोस्टर रिलीज
‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक
‘बाहुबली 2’चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement