एक्स्प्लोर
बाहुबलीच्या सिक्वेलचा फर्स्ट लूक "या दिवशी"
चेन्नई : सिनेदिग्दर्शक एस.एस.राजमौली प्रभासच्या वाढदिवशी 'बाहुबली द कन्क्लूजनचा' फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आणणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी 23 ऑक्टोबर रोजी या सिक्वेलचा एक विशेष पार्ट जाहीर करून प्रभासला वाढदिवसाचं एक आगळंवेगळं गिफ्ट देण्याची योजना आखली आहे.
मागच्या वर्षी प्रभासच्या वाढदिवशी बाहुबलीच्या पहिल्या सिक्वेलचं शूटिंग सुरू झालं होतं. यावेळी सेटवरच त्याचा वाढदिवस साजरा करून प्रभासला अनोखी भेट दिली होती.
सध्या या सिनेमाच्या क्लायमॅक्सचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू असून 28 एप्रिल 2017 रोजी बाहुबलीचा हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात राणा डुग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज आणि रम्या कृष्णन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
बाहुबलीचा पहिला भाग 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. यात कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडलं होतं. तसंच याबद्दल बरेच विनोदही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement