एक्स्प्लोर

बाहुबली 2 ची घोडदौड, 10 दिवसात 1 हजार कोटींचा पल्ला ओलांडला!

मुंबई : ‘बाहुबली 2’ चित्रपटाने देशविदेशातील सिनेरसिकांनाही वेड लावत 10 दिवसात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘बाहुबली 2’ ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘बाहुबली 2’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. दहा दिवसांमध्ये 1000 रुपयांचा गल्ला 'बाहुबली 2' नं जमवला आहे. बाहुबलीमध्ये शिवगामीने वाचवलेलं 'ते' बाळ कोण? ‘बाहुबली 2’ चा 10 दिवसात भारतासह जगभरातील कमाईचा आकडा 1000 कोटींच्या पार गेला आहे. यामध्ये भारतात 800 कोटी रुपये तर भारताबाहेर 200 कोटी कमाई 'बाहुबली 2' नं केली आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईत बाहुबली 2 ने सलमानच्या सुलतानचा रेकॉर्ड मोडला होता. सुलतानने पहिल्या आठवड्यात 208.82  कोटींची कमाई केली होती. 'बाहुबली 2'साठी प्रभासने 10 कोटींची जाहिरात नाकारली! दुसरीकडे, आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रमही मोडित निघाला आहे. दंगल चित्रपटानं आतापर्यंत एकूण 744 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ग्रॉसिंगमध्ये नवा विक्रम रचला आहे. पहिल्या आठवड्यात ‘दंगल’ने 197.54 कोटी कमावले होते. चित्रपट क्षेत्रातील जाणकार रमेश बाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. तसंच धर्मा प्रॉडक्शननंही 1000 कोटींचा पल्ला पार केल्याचं ट्विट केलं आहे. https://twitter.com/rameshlaus/status/861057493216227328 नवव्या दिवशी हिंदी बाहुबली 2 नं 26.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.  तर 10 दिवसांमध्ये हिंदीत एकूण 391 कोटींची कमाई बाहुबली 2 नं केली आहे. https://twitter.com/rameshlaus/status/861102963053535232

आमीरच्या पीके-दंगलचा विक्रम मोडित

ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 नंबर वन आहे. बाहुबली (1000 कोटी), पीके (792 कोटी), दंगल (744 कोटी) अशी क्रमवारी आहे. त्यामुळे ऑल टाईम कमाईत मिस्टर परफेक्शनिस्टचं असलेलं वर्चस्व मोडित निघालं आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावरही बाहुबली 1 आहे. या चित्रपटाने एकूण 650 कोटी कमवले होते.

शाहरुखचा विक्रम मोडण्यात मात्र प्रभास अपयशी

ओपनिंग डेच्या कमाईत मात्र हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, तर बाहुबली 2 ने 41 कोटी कमवले होते.

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

बाहुबली 2 नं पहिल्याच दिवशी भारतात एकूण (सर्व भाषा मिळून) 121 कोटींची कमाई केली होती. यात हिंदीतील 41 कोटींशिवाय, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यांच्या एकूण 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. हिंदी भाषेत बाहुबली 2 ला दीडशे कोटींचा टप्पा पार करण्यास चार दिवस (28 एप्रिल ते 1 मे – एक्स्टेंडेड वीकेंड) लागले. सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये जमवले, तर दंगलने 29.78 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे साहजिकच हिंदीत आमीर-सलमानचे ओपनिंग डे चे रेकॉर्ड प्रभासकडून मोडित निघाले. मात्र ओपनिंग डेला हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, म्हणजेच बाहुबली 2 पेक्षा 4 कोटी जास्त कमवले होते. ओपनिंग वीकेंड (एक्स्टेंडेड वीकेंड) ची बाहुबली 2 ची भारतातील कमाई : पहिला दिवस – शुक्रवार 28 एप्रिल – 41 कोटी दुसरा दिवस – शनिवार 29 एप्रिल – 40.5 कोटी तिसरा दिवस– रविवार 30 एप्रिल- 46.5 कोटी चौथा दिवस – सोमवार 1 मे – 40.25 कोटी पाचवा दिवस - मंगळवार 2 मे - 30 कोटी सहावा दिवस - बुधवार 3 मे - 26 कोटी सातवा दिवस - गुरुवार 4 मे - 22.75 कोटी आठवा दिवस - शुक्रवार 5 मे - 19.75 कोटी ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

संबंधित बातम्या

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

म्हणून बाहुबली इतकाच भल्लाल मनावर छाप पाडतो..

बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ….!

‘बाहुबली 2’ ची चौथ्या दिवशीची कमाई किती?

सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई

भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..

अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !

‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget