एक्स्प्लोर
Advertisement
'बघतोस काय...मुजरा कर', अंगावर शहारा आणणारा ट्रेलर रिलीज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'बघतोस काय... मुजरा कर' या सिनेमाची चर्चा सुरु होती. सिनेमाच्या ट्रेलरची सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे यांसारख्या दमदार अभिनेत्यांची फौज असलेल्या या सिनेमाचा ट्रेलरही तितकाच दमदार आहे. अंगावर शहारा आणणारा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर आता या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने एक लाखाच्या हिट्स पार केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, त्यांचं संवर्धन, त्यानंतर शिवस्मारकाची संकल्पना आणि या सर्व मुद्द्यांचं राजकारण अशा एकंदरीत गोष्टींना हात घालणारा हा सिनेमा असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येतंय.
जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, हेमंत ढोमे इत्यादी कलाकार या सिनेमात असून, सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यानेच केलं आहे. तर संजय छाब्रिया, गोपाल तायवाडे पाटील, वैष्णवी जाधव यांची निर्मिती आहे.
3 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या सिनेमचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सर्व रसिकांना लागली असेल, यात शंका नाही.
पाहा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement