एक्स्प्लोर

'Baby On Board: 'बेबी ऑन बोर्ड’चा ट्रेलर रिलीज; सीरिज 'या' दिवशी होणार प्रदर्शित

नुकताच ‘बेबी अॅान बोर्ड’मध्ये  (Baby On Board) या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि श्रुती यांच्या नात्याला फुटणारी नवी पालवी त्यांच्या आयुष्यात विविध बदल घडवताना दिसत असून प्रेग्नेंसीमध्ये श्रृतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सिद्धार्थची धडपड, काळजी यात दिसत आहे. तिचे डाएट सांभाळण्यापासून ते डॅाक्टरकडे चेकअपला जाताना दीड लिटर पाणी पिऊन जायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्याचे लक्ष आहे आणि हे सगळे सांभाळताना या दोघांमध्ये होणारी लुटूपुटूची भांडणे सीरिजमध्ये अधिकच धमाल आणत आहेत. ही एक कौटुंबिक सीरिज असून ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

‘बेबी ऑन बोर्ड’बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ही एक धमाल सीरिज आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना विशेषतः तरूणाईला जास्त जवळची वाटेल. हल्लीच्या कपल्समध्ये प्रेग्नेंसीचा प्रवास एकत्र असतो आणि हा प्रवास ते मनापासून त्यांच्या पद्धतीने एन्जॅाय करतात. प्रेक्षकांना नेहमीचं काहीतरी मनोरंजनात्मक हवं असतं आणि प्रेक्षकांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा आशयही असाच आहे. सर्व कुटुंबानं एकत्र पाहावी, अशी ही सीरिज आहे.’’ 

पाहा ट्रेलर: 

साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. 'बेबी ऑन बोर्ड' 28 ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Baby On Board: लवकरच येणार 'बेबी ऑन बोर्ड'; प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget