एक्स्प्लोर
'शुभमंगल सावधान'ला धोबीपछाड, 'बादशाहो'ची दमदार कमाई
अजय देवगणच्या ‘बादशाहो’ने शुक्रवारी 12.60 कोटी रुपये, शनिवारी 15.60 कोटी रुपये, रविवारी 15.10 कोटी रुपये आणि सोमवारी 6.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
!['शुभमंगल सावधान'ला धोबीपछाड, 'बादशाहो'ची दमदार कमाई Baadshaho Continues Its Box Office Collection On Monday 'शुभमंगल सावधान'ला धोबीपछाड, 'बादशाहो'ची दमदार कमाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/05113921/Shubh-Mangal-Saavdhan-Baadshaho.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या ‘बादशाहो’ने सोमवारीही चांगली कमाई केली. या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 43 कोटींची टप्पा पार केला होता. आता सोमवारच्या 6.80 कोटी रुपये कमाईसह ‘बादशाहो’ने चार दिवसात 50.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बादशाहो’ने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 12.60 कोटी रुपये, शनिवारी 15.60 कोटी रुपये, रविवारी 15.10 कोटी रुपये आणि सोमवारी 6.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
बॉक्स ऑफिसवर ‘बादशाहो’सोबतच रिलीज झालेल्या आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल सावधान’ने खास कमाई केली नाही. ‘बादशाहो’ आणि अगोदरपासूनच दमदार कमाई करत असेलेल्या अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ने ‘शुभमंगल सावधान’ला टक्कर दिली. या सिनेमाने चार दिवसात एकूण 16.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून अभिनेता अजय देवगन याने ट्विटरवरुन चाहत्यांचे आभार मानले. “बादशाहो सिनेमावरील प्रेम आणि प्रतिसाबद्दल आभार. तुमचं कौतुक करण्यापलिकडे देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही.”, असे अजयने म्हटलं आहे.
भारतातील एकूण 2800 स्क्रीनवर, तर परदेशात 442 स्क्रीनवर बादशाहो सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.
अजय देवगन, इम्रान हाश्मी, इलियाना डीक्रुज आणि ईशा गुप्ता यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. आणीबाणीच्या काळात या सिनेमाचं कथानक घडतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)