Ram Temple: रितेश म्हणतो, "500 वर्षांची प्रतीक्षा संपली" तर श्रेयस म्हणतो, "आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला"
Ram Temple: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ram Temple: अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्रभू श्रीराम रामाची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काही सेलिब्रिटींनी हा सोहळा घरात बसून पाहिला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रेयस तळपदे व्यक्त केल्या भावना
श्रेयस तळपदे यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस म्हणतो, "नमस्कार, अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला.याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला याच्यापेक्षा सौभाग्य काय असू शकतं.जय श्री राम!".
View this post on Instagram
रितेश देशमुखनं शेअर केलं ट्वीट
रितेश देशमुखनं ट्विटरवर ट्वीट (X) शेअर करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "जवळपास 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आमचे प्रभू श्री राम घरी परतले आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभ प्रसंगी मी हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण देशासोबत सामील झालो. आम्हाला हा सोहळ्याचा साक्षीदार होता आलं, यासाठी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो."
The wait of nearly 500 yrs is over. Our Ram Lalla is back home. On the auspicious occasion of #RamMandirPranPrathistha I join the entire country to celebrate this truly historic day. We are lucky & blessed to witness this in our life time. #JaiShriRam #JaiShriRam #JaiShriRam pic.twitter.com/zH7m9Jg5Iw
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 22, 2024
अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, "प्रभू रामाला पाहून मी भावूक झालो. प्रभू रामालाचे रूप सुंदर आहे. शिल्पकला खूप छान आहे. मी प्रभू रामाकडे कुटुंबातील सर्वांसाठी आशीर्वाद मागितले."
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Actor Vivek Oberoi says, "Lord Ram got me emotional. His (Ram Lalla) form is beautiful. The sculpting is so good. I feel that the Lord Ram actually came within the sculpture...I was very emotional and I sought blessings for everyone in the… pic.twitter.com/CFxw5bZD4U
— ANI (@ANI) January 22, 2024
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भवना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, "माझ्याकडे शब्द नाहीत. जेव्हा देव ठरवतो तेव्हा त्याला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: