Malaika Arora, Arjun Kapoor : बर्थडे सेलिब्रेशनची जोरदार तयारी, मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह परदेशी रवाना!
Malaika Arora, Arjun Kapoor : 26 जूनला अर्जुन कपूर त्याचा 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो मलायका अरोरासोबत बाहेर गेला आहे.
Malaika Arora, Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. पूर्वी दोघेही एकमेकांबद्दल बोलणे टाळायचे. मात्र, आता दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. बॉलिवूडची ही प्रसिद्ध जोडी चाहत्यांना कपाळ गोल्स देत असते. आता पुन्हा एकदा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कामातून वेळ मिळताच सुट्टीवर गेले आहेत. दोघेही रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दोन दिवसांनी म्हणजेच 26 जूनला अर्जुन कपूर त्याचा 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो मलायका अरोरासोबत बाहेर गेला आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, मलायका आपला बर्थडे वीकेंड जवळ आल्याची आठवण वारंवार करून देण्यास विसरत नसल्याचे म्हटले आहे. अर्जुन कपूरने मलायका अरोराकडून मिळालेल्या भेटवस्तूंची एक झलक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
पाहा व्हिडीओ :
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरची जोडी लोकांनाखूप आवडते आणि या जोडीने लवकरात लवकर लग्न करावे अशी सर्व चाहत्यांची इच्छा आहे. असेही अनेक लोक आहेत जे त्यांना सतत ट्रोल करत असतात. रात्री उशिरा विमानतळावरून समोर आलेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोक मलायका अरोराला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत. यावेळी अर्जुन कपूर विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसला, तर मलायका हुडी-शॉर्ट्ससह काळ्या बुटांमध्ये दिसली. यावर एका युजरने कमेंट करताना लिहिले की, 'मलायका पॅंट घालायला विसरली.'मलायका अरोराच्या ड्रेसिंग स्टाईलवर लोक अनेकदा टीका करत असतात.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अर्जुन कपूर मोहित सुरीच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय तो सध्या भूमी पेडणेकरसोबत 'लेडी किलर'चे शूटिंग करत आहे.
हेही वाचा :
Malika and Arjun Wedding Special Report: मलायका आणि अर्जुन लग्न करणार?
12 वर्षांनी लहान अर्जुन कपूरला डेट करणाऱ्या मलायका अरोराने सांगितली 'ही' मोठी गोष्ट!