एक्स्प्लोर
मलायकाने इंस्टाग्रामवर सांगितल्या केस बांधण्याच्या टिप्स, त्यावर अर्जुन म्हणतो...
आज मलायका अरोराने आपल्या इंस्टाग्रामवर पाच फोटोंची एक सिरीज शेअर केली आहे. यामध्ये ती आपल्या फॅन्सला केस बांधण्याच्या टिप्स देत आहे.
नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडील काही दिवसात या दोघांच्या डेटिंगचे किस्से नेहमी चर्चेत असतात. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या सोबत दिसून येतात.
यासोबतच हे दोघेजण आपल्या सोशल मीडियातील हालचालींवरून देखील नेहमीच चर्चेत असते. अर्जुन नेहमी मलायकाच्या फोटोंवर काही ना काही कमेंट करताना दिसून येतो. आता असाच एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.
आज मलायका अरोराने आपल्या इंस्टाग्रामवर पाच फोटोंची एक सिरीज शेअर केली आहे. यामध्ये ती आपल्या फॅन्सला केस बांधण्याच्या टिप्स देत आहे. या फोटोंसोबत तिने 'आपले केस बांधण्याची कला पाच स्टेप्समध्ये जाणून घ्या' असा संदेश लिहिला आहे.
मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने 'पाच फोटोंच्या नंतरही बांधू शकलोच नाही' अशी कमेंट केली आहे. यावर फॅन्सकडून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मलायका-अर्जुनच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. मलायका 45 वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या 33 वर्षांचा आहे. दोघांनीही आपल्या नातेसंबंधांबद्दल उघड वाच्यता केलेली नाही. मात्र अर्जुन आणि मलायका विवाहगाठ बांधणार असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. दोघं अनेकदा एकमेकांसोबत फिरताना दिसतात.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा 16 वर्षांचा मुलगा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement