एक्स्प्लोर
डोळ्यात रक्त, गळ्यावर जखमांच्या खुणा, 'परी'चा टीझर रिलीज
'परी' हा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात आणि डोळ्यासमोर सुंदर परीचं चित्र समोर येतं, पण ही 'परी' थोडी भयानक आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. अनुष्काने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'परी' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
18 सेकंदाचा हा टीझर पाहून रोमांच उभे राहितात. 'परी' येत्या 2 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता.
'परी' हा भयपट असून अनुष्काच्या होम प्रॉडक्शनअंतर्गत ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. NH10 आणि फिल्लौरीनंतर 'परी' हा अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा चित्रपट आहे.
'परी' हा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात आणि डोळ्यासमोर सुंदर परीचं चित्र समोर येतं, पण ही 'परी' थोडी भयानक आहे.
टीझरमध्ये अनुष्का एकटक पाहत असताना, हळूहळू तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा उमटतात. तर डोळ्यात रक्त दिसतं. टीझरच्या शेवटी अनुष्काचा भयावह लूक समोर येतो.
Sweet dreams guys... #HoliWithPari https://t.co/aMePVg992G
— Anushka Sharma (@AnushkaSharma) January 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement