एक्स्प्लोर
दिवाळीत 'ट्रिपल सीट' घेऊन अंकुश चौधरी येणार
सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष सखंद यांचे तर शार्दूल मोहन मोहिते आणि स्वप्निल कोरे हे कार्यकारी निर्माते आहेत.

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून सिनेमापासून दूर असलेला अंकुश चौधरी आता एक नवा रोमॅंटिक विषय घेऊन येत आहे. दिवाळीत अंकुश बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येणार आहे. यावेळी तो एकटा नव्हे तर चक्क 'ट्रिपल सीट' येणार आहे. नुकतेच संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित 'ट्रिपल सीट' या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले. 'वायरलेस प्रेमाची गोष्ट' अशा टॅगलाईनखाली येऊ घातलेल्या या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी बासरी हातात धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. हा चित्रपट एक रोमॅंटिक कथानक घेउन येत असल्याचे दिसत आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष सखंद यांचे तर शार्दूल मोहन मोहिते आणि स्वप्निल कोरे हे कार्यकारी निर्माते आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























