एक्स्प्लोर
संजय दत्तच्या सिनेमातून अंकिता लोखंडेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?
नवी दिल्ली : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे अखेर बॉलिडूमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेता संजय दत्तच्या मोस्ट अवेटेड ‘मंगल’ सिनेमातून अंकिता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिसली होती. त्यानंतर कोणत्याही मालिकेत दिसली नाही. मात्र, सुशांतसिंह राजपूत सोबतच्या अफेअरमुळे ती कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. मात्र, आता अंकिता थेट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
विशेष म्हणजे संजय दत्तच्या ‘मंगल’ सिनेमात अंकिता अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘मंगल’मध्ये पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत अंकिता असेल, अशीही चर्चा आहे.
एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’मध्ये अंकिताला मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र, काही कारणास्तव तिने त्या भूमिकेसाठी नकार दिला. आता अंकिताची बॉलिवूड एन्ट्री कोणत्या भूमिकेतून असणार आहे, याची उत्सुकता सिनेरसिकांना लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement