Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'पुढे कुणाचंच चालेना; पाच दिवसांत जगभरात केली 425 कोटींची कमाई
Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा सिनेमा जगभरात धमाकेदार कामगिरी करत आहे.
Animal Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. जगभरात या सिनेमाची चर्चा आहे. जगभरात या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत 425 कोटींची कमाई केली असून लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल.
वीकेंड नसतानाही 'अॅनिमल' हा सिनेमा पाहायला प्रेक्षक मोठ्या संख्येने जात आहेत. सोमवारी या सिनेमाने 'जवान' (Jawan) आणि 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमांचा रेकॉर्डही ब्रेक केला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. आता हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection Day 5)
अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी आणि पाचव्या दिवशी 38.25 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 283.74 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 425 कोटींचा गल्ला जमवला आहे. 500 कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे.
पहिला दिवस - 63.8 कोटी
दुसरा दिवस - 66.27 कोटी
तिसरा दिवस - 71.46 कोटी
चौथा दिवस - 43.96 कोटी
पाचवा दिवस - 38.25 कोटी
एकूण कमाई - 283.74 कोटी
'अॅनिमल' या सिनेमाने ओपनिंग वीकेंडलाच 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. भारतात लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल. रिलीजच्या सहाव्या दिवशीच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते.
'अॅनिमल'साठी रणबीरने घेतलंय तगडं मानधन (Animal Starcast Fees)
'अॅनिमल' या सिनेमासाठी रणबीरने 70 कोटी रुपयांचं तगडं मानधन घेतलं आहे. बॉबी देओलने चार-पाच कोटी रुपये आकारले आहेत. अनिल कपूर आणि रश्मिका मंदानाने दोन कोटी रुपये आकारले आहेत. तृप्ती डिमरीने 40 लाख रुपये घेतले आहेत. शक्ति कपूरने 30 लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे.
'अॅनिमल' या सिनेमाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. टी-सीरिज आणि सिने वन स्टुडियोच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या