(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aniket Vishwasrao: 'खोटी आश्वासने आणि दिशाभूल...'; एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव, म्हणाला, 'गेल्या चार दिवसांपासून...'
Aniket Vishwasrao: अनिकेतनं इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दोन एअरलाइन कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
Aniket Vishwasrao: अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अनिकेत हा सध्या त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आहे. अनिकेतनं इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दोन एअरलाइन कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
अनिकेतची पोस्ट
अनिकेत विश्वासरावनं काही तिकिटांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दोन निष्काळजी एअरलाइन्स, माझे चेक इन बॅगेज गेल्या चार दिवसांपासून गायब आहे. तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद होता, फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल. या चार दिवसात तुम्ही माझ्या बॅग ट्रॅक देखील करु शकला नाहीत.फक्त माफीचा ईमेल हा माझ्या समस्येचे निराकरण करणार नाही. तुमच्यातील professionalism च्या अभावामुळे आणि प्रवाशांबद्दलच्या तुमच्यातील सहानुभूतीच्या अभावामुळे मला खूप त्रास होत आहे. मला आशा आहे की, ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर काम पूर्ण कराल.'
'मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे या इंडस्ट्रीत गेल्या 24 वर्षांपासून काम करत आहे. पण मला असे अनुभव कधीच आले नाहीत. माझे "प्ले कॉस्ट्यूम" देखील मी माझ्या बॅगेत ठेवतो. त्यामुळे आता माझ्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. मला आशा आहे की, भविष्यात अशा समस्येचा सामना कोणालाही करावा लागणार नाही.' असंही अनिकेतनं पोस्टमध्ये लिहिलं.
अनिकेत विश्वासरावच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
फक्त लढ म्हणा,नो एन्ट्री: पुढे धोका आहे, बघतोस काय मुजरा कर, पोश्टर गर्ल या मराठी चित्रपटांमध्ये अनिकेतनं काम केलं. गेल्या काही दिवसांपासून अनिकेत हा ऊन-पाऊस, कळत नकळत या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. अ परफेक्ट मर्डर या नाटकाच्या माध्यमातून सध्या अनिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनिकेतनं या नाटकाचे प्रयोग परदेशात देखील केले आहेत. अनिकेत हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Marathi Actors: मराठी कलाकार आणि कॉन्ट्रोव्हर्सी; 'या' कारणांमुळे कलाकार अडकले वादाच्या भोवऱ्यात