(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Bachchan यांचं Kamla Pasand कंपनीला कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 79 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी 'कमला पसंद' सोबतचा करार रद्द केला होता.
Amitabh Bachchan sent legal notice to Kamla Pasand: बॉलिवूडचे जेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनी कमाल पसंदला कायदेशीर नोटीस पाठवलीय. अमिताभ बच्चन यांनी कमला पसंदसोबत करार करत त्यांची जाहीरात केली होती. ज्यामुळं अमिताभ बच्चन यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 79 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी 'कमला पसंद' सोबतचा करार रद्द केला होता. मात्र, त्यानंतरही कंपनीकडून जाहिरातीचं प्रसारण सुरुच होतं. याच जाहीरातीचं प्रसारण तात्काळ थांबवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद कंपनीला नोटीस पाठवलीय.
ही जाहीरात सरोगेट जाहिरातींच्या अंतगर्त येत असल्याची त्यांना माहिती नव्हती, असं अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण दिलंय. यानंतर अमिताभ यांनी महत्वाचं पाऊल उचलत पान मसाला कंपनीला त्यांच्या जाहिराती बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवलीय. त्यांना प्रमोशनसाठी मिळालेली रक्कम देखील त्यांनी कंपनीला परत केलीय. तसेच या जाहिरातींच प्रसारण करणं थांबवाव, असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळं खूप दिवसांपासून ट्रोल केलं जातं होतं. त्यानंतरच त्यांनी कमला पसंतसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. पान मसाला ब्रँडसोबतचा करार संपल्यावरही त्यांना ट्रोल केलं जातं होतं. यावर अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. हा व्यवसायाचा भाग आहे. ज्यामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळतो, असे त्यांनी म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-