(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Antim चित्रपटातील सलमानचा लूक व्हायरल, ट्विटरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
बहुप्रतिक्षित अंतिम चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु असताना सिनेमाचा हिरो सलमानचा एक लूकही व्हायरल झाला आहे.
Antim The Final Truth : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याचा आगामी चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) घेऊन उद्या अर्थात 26 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचा रिमेक असणाऱ्या या चित्रपटाची चर्चा जोरदार असताना आता सलमानच्या नव्या लूकमूळे चर्चांना आणखीच उधाण आलं आहे.
सिनेमाच सलमान खान एका महाराष्ट्रीयन पंजाबी पोलिसाची भूमिका साकारत आहे. यावेळीच एका दृश्यात सलमानची विनापगडी अगदी रागात दिसत आहे. यावेळी त्याचे भले-मोठे केस सुटलेले असताना तोही अत्यंत रागात आहे. त्याच्या याच लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी सलमानचे या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. यामुळेच #AnitmEkdin हा हॅशटॅगही ट्विटरला व्हायरल होत आहे.
Good Review Of #Antim Is Coming
Rating : ⭐⭐⭐⭐/5#Antim1din @BeingSalmanKhanpic.twitter.com/ObBFWpjmSM https://t.co/TP18JP3JWA
">
#AntimEkDin book tickets for Antim pic.twitter.com/Gbx07xxKKl
— ANTIM ON 26 NOV. (@Superma39932311) November 25, 2021">
Close Enough 🔥😍💥
Salman as Rajveer Singh 💥❤️#antim pic.twitter.com/p5mr2FR8dv
">
'मुळशी पॅटर्न'चा रिमेक
'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 'भाई का बर्थडे', 'होने लगा' आणि 'चिंगारी' अशी सिनेमातील हटके गाणी प्रदर्शित झाली आहेत.
हे ही वाचा
- Samantha React On Priyanka Chopra : प्रियांकाने निक जोनसची उडवली खिल्ली; समंथाच्या रिअॅक्शनने वेधलं लक्ष
- Dev Anand: देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं घातली होती बंदी, कारण ऐकून व्हाल हैराण
- Antim : सलमान खानला पुणेकरांच्या प्रेमाची मोजावी लागली मोठी किंमत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha