Kangana Ranaut Summoned: कंगना रनौतला दिल्ली विधानसभेकडून समन्स, 6 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश
Kangana Ranaut Summoned: कंगनाविरुद्ध असणाऱ्या तक्रारींनुसार तिच्या एका सोशल मीडिया पोस्टने शीख बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या सिनेमांपेक्षा विविध अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने शीख समुदयाला खलिस्तानी आंतकवादी म्हणत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. कंगनाचं ट्विटर अकाउंट याआधीच हटवण्यात आलं असलं तरी तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावलं आहे. आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नेतृत्वाखाली समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगतिले आहे. चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
कंगनाविरुद्ध अनेक तक्रारी आल्या असून यामध्ये तिने शेतकरी आंदोलकांना 'खालिस्तानी आतंकवादी' म्हटल्याने मोठी खळबळ उडाली. या वक्तव्यामुळे शीख बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं तक्रारकर्त्यांच म्हणणं आहे. याच तक्रारकर्त्यांनीच शांती आणि सद्भाव संबंधी समितीचे अध्यक्ष आणि आमदार राघव चड्ढा यांना या मुद्द्यावर लक्ष्य देण्यास सांगितलं. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून आता कंगनाला समितीसमोर हजर राहणं अनिवार्य आहे.
काय होती कंगनाची पोस्ट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने तिच्या इन्स्टा स्टोरीतून एक वादग्रस्त वक्तव्य केलं. तिने लिहिलं होतं की,'खालिस्तानी आतंकवादी आज सरकारला भटकवू शकतात. पण एका महिलेने यांना एका काळी चपलाखाली चिरडलं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तिने त्यांना मच्छरांप्रमाने चिरडलं होतं. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. त्या महिलेच्या मृत्यूच्या कित्येक वर्षानंतर आजही हे लोक तिच्या नावाने कापतात. यांना असाच गुरु हवा.'
कंगनाला हजर राहणं अनिवार्य
कंगनाला विधानसभेतर्फे सुनावण्यात आलेल्या समन्सनंतर तिला समितीसमोर हजर राहणं अनिवार्य आहे. कारण कायद्यानुसार या समन्सविरुद्ध कोर्टात देखील धाव घेता येत नाही. त्यामुळे समितीसमोर कंगनाचं हजर राहणं अटळ आहे. पण नेमकी कंगना काय यानंतर काय भूमिका घेणार? हे पाहाव लागेल.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut Update : कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, शेतकऱ्यांना म्हणाली 'खलिस्तानी'
Kangana Ranaut : कंगनाची इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी, शीख समुदाय आक्रमक
Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha