एक्स्प्लोर
ओदिशातील फनीग्रस्तांना ‘बिग बीं’चा मदतीचा हात
या आधीही ‘बिग बीं’नी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.
मुंबई : मुसळधार पाऊस आणि 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह 'फनी' चक्रीवादळाने शक्रवारी ओदिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली. या वादळामुळे ओदिशातील जनजीवन विस्कळीत झाले. याच ओदिशातील फनीग्रस्तांना बॉलिवूडच्या ‘बिग बीं’नी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: याबद्दल ट्वीट करत माहिती दिली.
तसेच या आधीही ‘बिग बीं’नी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. यावेळी त्यांनी फनीचा फटका बसलेल्या ओदिशावासियांना बच्चन यांनी मदत जाहीर केली असून इतरांनाही मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. ‘बिग बीं’नी यावेळी एक कविताही पोस्ट ट्विट केली आहे. 'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान हर तूफ़ान से लड़ेंगे हम न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम हर चोट पर मरहम लगाएंगे हम'. ओदिशात फनीचे 16 बळी मुसळधार पाऊस आणि 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह 'फनी' वादळामुळे ओदिशात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या वादळामळे पूर्व किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. VIDEO | फनी ठरलं 20 वर्षातलं सर्वात विध्वसंक वादळ | ओदिसा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझाT 3154 - 'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान हर तूफ़ान से लड़ेंगे हम न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम हर चोट पर मरहम लगाएंगे हम'
Donate generously to CM Relief Fund .. I DID !!https://t.co/FiwUel4F0h — Amitabh Bachchan (@SrBachchan) May 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement