एक्स्प्लोर

Ameya Khopkar: 'पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून...'; अमेय खोपकर यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

नुकतेच अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधत असतात.  नुकतेच अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

अमेय खोपकर यांचे ट्वीट

अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.' अमेय खोपकर यांच्या या ट्वीटला काही नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे.

अमेय खोपकर हे अनेकवेळा ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर टीका करत असतात.  मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. 'बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.' असं ट्वीट अमेय खोपकर यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. 

'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' या पाकिस्तानी चित्रपटाचा विरोध देखील अमेय खोपकर यांनी केला होता.  'नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.' असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केले होते. 

माहिरा खान,वीना मलिक, सबा कमर या पाकिस्तानी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. तसेच अली जफर पाकिस्तानी अभिनेत्यानं देखील बॉलिवूडमध्ये काम केले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ameya Khopkar: 'कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर...'; अमेय खोपकर यांचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget