एक्स्प्लोर
अमिताभ बच्चन यांनी झाडू मारावा : अमर सिंहांचा घणाघात
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार अमरसिंह यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
मोदी सरकारनं अमिताभ यांना स्वच्छता दूत बनवल्यानं त्यांनी शूटिंग वगैरे सोडून जन्मठिकाण असलेल्या अलाहाबाद आणि मोदींच्या वाराणसीमध्ये झाडू मारावा, असा घणाघात अमर सिंहांनी केला.
राष्ट्रपतीपदासाठी मोदींची अमिताभ यांना पसंती: अमर सिंह
अमिताभ आणि अमर सिंहांच्या मैत्रीच्या एकेकाळी चर्चा होत्या. मात्र मध्यंतरी अमरसिंहांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, त्यावेळी अमिताभ यांनी त्यांना साथ दिली नव्हती. त्यामुळे नाराज असलेल्या अमरसिंहांनी अमिताभ यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचं कळतंय. अमर सिंह हे एकेकाळी बच्चन कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे मानले जाते होते. अमिताभ बच्चन हे आपले मोठे भाऊ आहेत, असं अमर सिंह म्हणत असत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अमर सिंह यांच्या सांगण्यावरून बच्चन यांनी समाजवादी पक्षाचा प्रचारही केला होता. मात्र काही कारणामुळे अमर सिंह आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये बिनसलेले संबंध आजपर्यंत कायम आहेत.संबंधित बातम्या
बिग बींना राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हांची फील्डिंग राष्ट्रपतीपदासाठी मोदींची अमिताभ यांना पसंती: अमर सिंहजया बच्चन यांनीही बीफ खाल्लं : अमर सिंह
बिग बींनी पार्टीचं आमंत्रण न दिल्याने अमर सिंह नाराज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement