RRR song Sholay : वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; 'आरआरआर'मधील शोले गाणं रिलीज
आरआरआर (RRR) या चित्रपटामधील शोले (Sholay) हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
![RRR song Sholay : वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; 'आरआरआर'मधील शोले गाणं रिलीज alia bhatt ram charan jr ntr film rrr celebration anthem sholay song release RRR song Sholay : वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; 'आरआरआर'मधील शोले गाणं रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/8e81e090114292885c0168b73eceb955_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RRR song Sholay : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आज 29 वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी आलियाचा जन्म झाला. बालपणापासूनच आलियाला अभिनयाची आवड आहे. वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. तिचा आरआरआर (RRR)हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज वाढदिवसानिमित्त आलियानं तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. या चित्रपटामधील शोले (Sholay) हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
शोले या गाण्यामध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांच्यासोबत आलिया थिरकताना दिसत आहे. या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर एम. एम. करीम हे आहेत. तर हे गाण विशाल मिश्रा, बेनी दयाल, साहिथी चगन्ती आणि हरिका नारायण यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार रिया मुखर्जी या आहेत.
एसएस राजामौली यांनी आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये आलिया, ज्यूनियर एनटीआर, राम चरण यांच्यासोबतच अजय देवगण देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)