Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
Bollywood : प्रेक्षकांसाठी यंदाची होळी खास असणार आहे. अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Bollywood Movies : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' ते विद्या बालणच्या 'जलसा'चा समावेश आहे.
बच्चन पांडे : अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिसचा 'बच्चन पांडे' सिनेमा रंगपंचमीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
ब्लडी ब्रदर्स : ब्लडी ब्रदर्स हा सिनेमा 18 मार्चला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा रहस्यमय सिनेमा असणार आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करणार आहे.
जलसा : जलसा सिनेमादेखील 18 मार्चला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर 'या' राज्यांत 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त
The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha