TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
पॉंडीचेरीमध्ये पहिल्यांदाच झळकला मराठी चित्रपट
काही दिवसांपूर्वी 'पॉंडीचेरी' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा भारतातातील पहिला चित्रपट आहे. नात्याची एक वेगळी परिभाषा अधोरेखित करणाऱ्या या सिनेमाने चित्रपटगृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या चित्रपटाचा पॉंडीचेरीमधील चित्रपट महोत्सवात विशेष शोसुद्धा सादर करण्यात आला आहे.
अभिषेक बच्चनचा 'दसवीं' जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा'दसवीं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिषेक गंगाराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चक्क तिसऱ्याचं दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या तिसऱ्याच दिवशी चित्रपटाने 27 कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केले आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करावा
विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त करण्याची विनंती केली आहे.
संबंधित बातम्या
The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर 'या' राज्यांत 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त
Radhe Shyam : प्रभासच्या 'राधे श्याम'ने केली 150 कोटींची कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha