Alia Bhatt | आलिया भट्ट कोरोना निगेटिव्ह, म्हणाली- वेळच अशी की निगेटिव्ह असणं आनंददायी
काही दिवसापूर्वी अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सांगितलं होतं की ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. आता तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने कोरोनावर मात केली असून तिचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. ही बातमी स्वत: आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून दिली असून तिने सांगितलं की पहिल्यांदाच निगेटिव्ह असणं आनंददायी वाटत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
View this post on Instagram
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आलियाने स्वत: ला होम क्वारन्टाईन केलं होतं. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे ती उपचार घेत होती.
आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारत असलेला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला असून त्यामध्ये आलियाच्या अभिनयाचे कौतुक केलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता रणबीर कपूर बरा झाला असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. रणबीर बरा झाल्यानंतर आलिया रणबीरसोबत जुहू येथे दिसली होती. रणबीर आणि आलिया ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात प्रथमच एकत्र दिसणार आहेत. आलिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दलच्या पोस्ट्स नेहमी शेअर करत असते.
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा बसत असून अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, आमीर खान, विकी कौशल, कॅटरिना कैफ, गोविंदा, आदित्य नारायण, आर माधवन, संजय लिला भन्साळी, गायक बप्पी लहिरी, भूमी पेडणेकर, कॉमेडियन कुनाल कामरा याच्यासह अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- India Pakistan War | येत्या पाच वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या युद्धाची शक्यता; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खात्रीलायक अहवाल
- Qatar Drug Case | कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षानंतर मुंबईला परतणार
- Corona | लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच एक कोटी लसीकरणाचा विक्रम, आतापर्यंत 11 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण