(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona | लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच एक कोटी लसीकरणाचा विक्रम, आतापर्यंत 11 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण
देशात आतापर्यंत 11 कोटी 10 लाख 33 हजार 925 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच एक कोटीहून जास्त लस देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून आतापर्यंत 11 कोटी 10 लाख 33 हजार 925 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच कोरोनाच्या एक कोटीपेक्षा लसी टोचण्याचा विक्रम करण्यात आला आहे.
लस उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, मंगळवारी 25 लाखाहून जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत सांगण्यात आलंय की, देशात रोज 45,000 कोविड लसीकरण केंद्र सुरू असतात. मंगळवारी या केंद्रांच्या संख्येत जवळपास 21,000 ची वाढ करण्यात आली असून ती 67,893 इतकी करण्यात आली होती. लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी 30 लाख डोस, दुसऱ्या दिवशी 40 लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखाहून जास्त डोस देण्यात आले आहेत.
देशातील लसीकरणाचा कार्यक्रम 16 जानेवारीला सुरू झाला आहे. आतापर्यंत 11 कोटी 90 लाख 48 हजार 79 लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. 55 हजार 80 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असून राज्यातही लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येतंय.
14 एप्रिलपर्यंत देशभरात 'लस उत्सव'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर 10 एप्रिलपासून लस उत्सव सुरू करण्यात आला आहे. तो 14 एप्रिलपर्यंत सुरू राहिल. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती; कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी साकारुन अभिवादन
- Maharashtra Partial Lockdown : आता 50 नव्हे, 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार 'शुभमंगल', नवे निर्बंध जारी
- OnePlus Watch | येत्या 21 एप्रिलपासून भारतात OnePlus Watch ची विक्री सुरू, जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही...