एक्स्प्लोर
आलिया भटने मागितली कंगना रनौतची माफी
आमीर खान आणि आलिया भट यांना बोलावून सुद्धा ते मणिकर्णिका सिनेमा पाहायला आले नाही, म्हणून कंगनाने खंत व्यक्त केली होती. इतर बॉलिवूड सेलिब्रेटी त्यांचा सिनेमा पाहायला बोलवतात, मात्र त्यांना माझा सिनेमा पाहायला बोलावलं असता ते आले नाहीत, अशी नाराजी तिने व्यक्त केली आहे.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट हिने कंगना रनौतचा मणिकर्णिका सिनेमा पाहायला न गेल्याने कंगनाची माफी मागितली आहे. गली बॉयच्या प्रमोशन कार्यक्रमात ती बोलत होती. 'मणिकर्णिका' पाहायला बोलावून सुद्धा कुणीही बॉलिवूड सेलिब्रेटी आले नाहीत म्हणून कंगना रनौत नाराज आहे. तिने याबाबत तिच्या शैलीत तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कंगना रनौतचा राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आमीर खान आणि आलिया भट यांना बोलावून सुद्धा ते मणिकर्णिका सिनेमा पाहायला आले नाही, म्हणून कंगनाने खंत व्यक्त केली आहे. इतर बॉलिवूड सेलिब्रेटी त्यांचा सिनेमा पाहायला बोलवतात, मात्र त्यांना माझा सिनेमा पाहायला बोलावलं असता ते आले नाहीत, अशी नाराजी तिने व्यक्त केली आहे.
आलिया भटने मला राझी सिनेमाचा ट्रेलर पाठवून ते पाहण्याची विनंती केली होती. आलियाचा किंवा करण जोहरचा सिनेमा आहे म्हणून मी पाहिला नाही तर सहमत खान हिच्यावर आधारित हा सिनेमा आहे म्हणून मी पाहिला. मात्र हे लोक सिनेमाला माणसाशी जोडून बघतात, असं कंगना म्हणाली.
कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर आलिया भटने कंगनाची माफी मागितली आहे. ती म्हणाली, 'मी गली बॉय सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. कंगनाला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. कंगनाला वाईट वाटलं असेल तर याबद्दल मी तिची माफी मागते', असं आलिया म्हणाली. शिवाय कंगना खूप बिंधास्तपणे आपले मत व्यक्त करते. हे बोलण्यासाठी धाडस लागते, असं देखील आलिया म्हणाली.
मणिकर्णिका या सिनेमात कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तीरेखा साकारली आहे. शिवाय या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा तिने केलं आहे. या सिनेमात कंगनासह सुरेश ओबेरॉय, डॅनी, अंकिता लोखंडे हे प्रमुख भूमिकेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement