एक्स्प्लोर
'गोल्ड' सिनेमातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी गोल्ड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इंग्लंडमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. आता अक्षयने या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. ट्विटरवर सिनेमातील लूकची माहिती देताना अक्षयने पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचा उल्लेख केला आहे. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "नवा प्रवास सुरु, गोल्डपेक्षा कमी काही नको. 'गोल्ड'चा पहिला दिवस. तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत." https://twitter.com/akshaykumar/status/881173630754881536 स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडनमध्ये आयोजित चौदाव्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे. https://twitter.com/Roymouni/status/881233472227991552 सिनेमाचं दिग्दर्शन रीमा कागती करत आहेत. या टीव्ही अभिनेत्री मौनी राय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 2018 मध्ये स्वातंत्र्यादिनाच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय पहिल्यांदाच एक्सेल इंटरटेन्मेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करत आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/881023359651385344 सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमासाठी अनेक हॉकी प्रशिक्षकांची मदत घेण्यात आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगआधी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहकडून सिनेमाच्या टीमने प्रशिक्षण घेतलं, जेणेकरुन शूटिंगदरम्यान सर्व कलाकार मैदानावर खऱ्याखुऱ्या हॉकी खेळाडूंप्रमाणेच खेळताना दिसतील. दरम्यान, अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा सिनेमा यंदा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पाहा ट्रेलर…
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























