'खिलाडी' अक्षय कुमारचा आगीशी खेळ, कपड्यांना आग लावत स्टेजवर एन्ट्री
अक्षय कुमारने असे स्टंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अक्षयचे विविध स्टंटचे व्हिडीओ समोर आले आहे. मात्र अभिनेते ज्यावेळी असे स्टंट करतात त्यावेळी त्यांच्यासोबत स्टंट मास्टर्स आणि एक्सपर्ट्स सोबत असतात. त्यामुळे कुणीही असे स्टंट घरी करु नयेत.
!['खिलाडी' अक्षय कुमारचा आगीशी खेळ, कपड्यांना आग लावत स्टेजवर एन्ट्री akshay kumar put fire on his clothes and goes to stage 'खिलाडी' अक्षय कुमारचा आगीशी खेळ, कपड्यांना आग लावत स्टेजवर एन्ट्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/05153518/akshay-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार बॉलिवुडमध्ये 'खिलाडी कुमार' नावाने प्रसिद्ध आहे. अक्षयच्या सिनेमातील जबरदस्त अॅक्शन, स्टंट सीनमुळे त्याला ही ओळख मिळाली आहे. अक्षयने पुन्हा त्याच्या नावाला साजेसा असा स्टंट केला आहे. अक्षयने मोठ्या हिमतीने स्वत:ला आग लावून घेत अंगावर काटा येईल असा स्टंट आपल्या चाहत्यांसाठी सादर केला.
अक्षय मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. अक्षयला आयोजकांनी स्टेजवर येण्याची विनंती केली, त्यावेळी अक्षयने त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये स्टेजवर एन्ट्री घेतली. अक्षयने कपड्यांवर आग लावली आणि स्टेजवर एन्ट्री घेतली होती. उपस्थितांना काही वेळ स्टेजवर नेमकं काय घडतंय काही कळायला मार्ग नव्हता.
अभिनेता अक्षय कुमार आता ऑनलाईन जगतात प्रवेश करायला सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी महालक्ष्मी येथे झालेल्या कार्यक्रमात अक्षय आपल्यासोबत सीरिज करणार असल्याचे अॅमेझॉन प्राईमने जाहीर केलं. 'द एन्ड' असं या वेब सीरिजचं नाव असणार आहे. ही वेब सीरिज अॅक्शन धमाका असणार आहे, याची प्रचिती या कार्यक्रमात आली. अक्षयने या कार्यक्रमात आगीशी खेळ करत एन्ट्री घेतली.अक्षय कुमारने असे स्टंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अक्षयचे विविध स्टंटचे व्हिडीओ समोर आले आहे. मात्र अभिनेते ज्यावेळी असे स्टंट करतात त्यावेळी त्यांच्यासोबत स्टंट मास्टर्स आणि एक्सपर्ट्स सोबत असतात. त्यामुळे कुणीही असे स्टंट घरी करु नयेत.
अक्षय सध्या त्याच्या 'केसरी' सिनेमामध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)