एक्स्प्लोर
लिझाला डिवचल्याने अक्षयची सटकली, सिद्धार्थ जाधववर वैताग
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अभिनेता सिद्धार्थ जाधववर चिडल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'कॉमेडी नाईट्स बचाओ' कार्यक्रमात स्कीटमध्ये अभिनेत्री लिझा हेडनची खिल्ली उडवल्यामुळे अक्षयचा पारा चढल्याचं म्हटलं जातं.
अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय, रितेश, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस कलर्सवरील कॉमेडी नाईटस बचाओ या कार्यक्रमात आले होते. एआयबी रोस्टच्या धर्तीवर असलेल्या या कार्यक्रमात नेहमीच पाहुण्यांची टर उडवली जाते. मात्र यावेळी विनोदाच्या नावाखाली केला जाणारा लिझाचा अपमान अक्षयला आवडला नाही आणि त्याचा पारा चढला.
ऑस्ट्रेलियाहून आलेल्या लिझा हेडनला सिद्धार्थ जाधवच्या स्कीटमध्ये कांगारु असं संबोधण्यात आलं. याचप्रमाणे आणखी एक वर्णद्वेषी कमेंट केल्यामुळे लिझा आणि जॅकलिन अनकम्फर्टेबल असल्याचं रितेश आणि अक्षयला जाणवलं. लिझाला जी भाषा समजतही नाही, त्या भाषेत तिच्यावर विनोद करणं अशोभनीय असल्याचं मत अक्षयने व्यक्त केल्याचंही युनिटमधील एकाने सांगितलं. त्यामुळे अक्षयने
तात्काळ खाली उतरुन सिद्धार्थला थांबवल्याची माहिती आहे.
अक्षयच्या हस्तक्षेपानंतर स्क्रिप्टमध्ये तात्काळ बदल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अक्षयची बाजू कळू शकलेली नाही तर सिद्धार्थ जाधवने मात्र असं काहीच घडलं नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट होता का, अशी चर्चाही सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement