एक्स्प्लोर
‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत
अभिनेता अक्षय कुमार ‘केसरी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला असून त्याच्या छातीला किरकोळ मार लागला आहे.

पाहा आणखी फोटो
सातारा : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘केसरी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे. शूटिंगवेळी एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत झाली. मात्र, ही दुखापत किरकोळ असल्याचं समजतं आहे.
साताऱ्यातील वाठार येथे स्टंट करताना अक्षय कुमार थेट छातीवर आपटला. त्यामुळे त्याच्या बरगडी आणि छातीला किरकोळ मार लागला. या अपघातानंतर त्याच्यावर तात्काळ उपचारही करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अक्षय कुमार सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात 'केसरी' या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी मुक्कामाला आहे. अक्षय कुमारचा केसरी सिनेमा 22 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘केसरी’च्या सेटवर जाऊन अक्षय कुमारची गळाभेट घेतली होती.
संबंधित बातम्या :
साताऱ्यात उदयनराजे आणि अक्षय कुमारची गळाभेट
हातात खोरं घेऊन साताऱ्यात अक्षयकुमारचं श्रमदान
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement


















