Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये खिलाडी कुमारचा धमाकेदार फरफॉर्मन्स, पण त्यासाठी अक्षयला मोडावा लागला त्याचा फार जुना नियम
Akshay Kumar at Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यांना अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमार देखील उपस्थित होता.
Akshay Kumar at Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : मार्च महिन्याची सुरुवात ही एका धमाकेदार सोहळ्याने झाली होती. अंबानी कुटुंबियांच्या एका भव्य दिव्य सोहळ्याला बिल गेट्स पासून ते संपूर्ण बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी जामगनरमध्ये दिग्गजांची रेलचेल पाहायला मिळाली. प्रत्येकाने या सोहळा अगदी आनंदाने अनुभवला. या सोहळ्यात तिन्ही खानचा परफॉर्मन्स असो किंवा हॉलीवूड पॉप स्टार रिहाना (Rihanna) असो या प्रत्येकाच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चांद लावले. या कार्यक्रमासाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील उपस्थित होता.
1 ते 3 मार्च दरम्यान जामनगरमध्ये अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये पाहुण्यांचा रॉयल पाहुणचार देखील करण्यात आला होता. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झालेत. प्री-वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी संगीत आणि गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडचा जलवा पाहायला मिळाला. तसेच खिलाडी कुमार म्हणजेच अक्षयचा देखील धमाकेदार परफॉर्मन्स या सोहळ्यात झाला.
अक्षयला मोडावा लागला त्याचा नियम
अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगचा कार्यक्रम हा जवळपास पहाटे 3 वाजेपर्यंत सुरु होता. या सोहळ्यात 3 वाजेपर्यंत सगळेजण आनंदाने सहभागी झाले होते. यावर ई-टाईम्सशी बोलताना अक्षयने नुकताच एक खुलासा केला आहे. अक्षय कुमारला लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी बोलताना त्यानं म्हटलं की, हा कार्यक्रम पहाटे 3 पर्यंत सुरु होता. अंबानी कुटुंबिय अत्यंत प्रेमळ आणि काळजी घेणारं आहे. त्यांनी कोणालाही एकटं पाडलं जाणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. हा सोहळा आम्ही आनंदाने साजरा केला.
लवकरच झळकणार या चित्रपटात
अक्षय कुमार लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. तसेच 2024 हे वर्ष अक्षयसाठी खास ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अक्षयचे जवळपास नऊ चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. यातील दोन चित्रपटांमध्ये त्याचा कॅमिओ असणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'नंतर 'सरफिरा', 'सिंघम अगेन', 'स्काय फोर्स', 'वेलकम टू द जंगल', 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर', 'खेल-खेल में' आणि 'हेरा फेरी 3' या चित्रपटांची सध्या चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram