Ajinkya Deo: सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावूक पोस्ट; म्हणाले, 'आई बाबा दोघेही गेले...'
Seema Deo: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सीमा देव आणि रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे निधन झाले. सीमा देव यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरच्या माध्यमातून सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली. सीमा देव यांचे पूत्र अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सीमा देव आणि रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर सीमा देव आणि रमेश देव यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आई बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्त आठवणी… सुंदर गोड आठवणी' अजिंक्य देव यांच्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली.
View this post on Instagram
सीमा देव आणि रमेश देव यांचे चित्रपट
आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं. सीमा देव यांनी जवळपास 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच 'आनंद', 'घराना', 'सोने पे सुहागा', 'गोरा', 'मिस्टर इंडिया', 'कुदरत का कानून', 'दिलजला', 'शेर शिवाजी', 'प्यार किया है प्यार करेंगे' या चित्रपटांमध्ये रमेश देव यांनी काम केले.
सीमा देव आणि रमेश देव यांनी 1 जुलै, 1963 रोजी लग्नगाठ बांधली. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केले होते. रमेश देव यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले.
सीमा देव आणि रमेश देव या दोघानांही दोन मुलं असून यातील एक म्हणजे अजिंक्य देव आणि एक अभिनय देव. अजिंक्य हे एक प्रसिद्ध नट असून हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकरल्या आहेत. तर अभिनय हा दिग्दर्शक असून तो कथा-पटकथा देखील लिहितो. प्रसिद्ध सिनेमा दिल्ली-बेल्लीचं दिग्दर्शन त्यानेच केलं आहे. सीमा देव यांच्या निधनानं देव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या
Smita Deo Post : सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावूक पोस्ट, म्हणाल्या, 'सासू नाही माझी आईच..'