एक्स्प्लोर
अजय देवगनचा 25 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ‘लिपलॉक’ सीन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या सिनेक्षेत्रातील करिअरला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजयने आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीसोबत लिपलॉकचा सीन केला नव्हता. मात्र, लिपलॉक न करण्याचा अलिखित नियम अजयने ‘शिवाय’मधून तोडला आहे.
आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अजय देवगनने ‘शिवाय’ सिनेमाच्या निमित्ताने सहअभिनेत्री एरिका कार हिच्यासोबत तीन मिनिटांचा लिपलॉक सीन शूट केला आहे. 22 सप्टेंबरला सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज होणार आहे. अजयच्या या सीनबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये मात्र प्रचंड उत्सुकता दिसून येते आहेत.
अजयने आपल्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये लिपलॉक सीन केला नाही. मात्र, आता ‘शिवाय’मध्ये अशी काय गरज पडली, की लिपलॉक सीन करावा लागला, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
‘शिवाय’ सिनेमा 28 ऑक्टोबरला रिलीज होणार असून, या सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मितीही अजय देवगनने केली आहे. शिवाय, सिनेमात मुख्य भूमिकेतही अजय देवगन आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement